विविध मागण्यांसाठी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांची कार्यालयासमोर निदर्शने

रोहा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी भव्य राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु ३१ जुलै २०२३ रोजी विधान सभेचे कामकाज बंद असल्याने काढण्यात येणारा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आलेला आहे व राज्य पातळीवर संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात आली. 

तसेच याबाबत शासनाकडे संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. आज आम्ही सर्व कर्मचारी नगर परिषदेसमोर निदर्शने करीत आहोत या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास भविष्य काळात कामगारांमधील असंतोषाचे राज्यव्यापी आंदोलनामध्ये रूपांतर होणार याची नोंद घ्यावी, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog