ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रोह्याचे रस्ते खड्ड्यात! नगर अभियंत्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष? निष्ठा फक्त बिल्डर्ससाठी

जपून जपून जपून जा रे... पुढे खड्डा आहे

रोहा : किरण मोरे

पावसाळा सुरू झाला की त्यापाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच! वर्षानुवर्षे हाच अनुभव येत आहे. जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे रोह्याच्या रस्त्यांचे भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे, असा प्रश्न पडताे. अशा रस्त्यांवरून ये-जा करताना पाेटात खड्डा येता. नगर पालिकेचा बांधकाम विभाग विकासकांना परवानग्या देण्यात धन्यता मानत आहे. गावात जागोजागी रॅबीट, ग्रीट आणि खडीचा खच पडला आहे. बांधकाम अभियंत्यांच्या अर्थपूर्ण नाकर्तेपणामुळे गावाचा डंपिंग ग्राउंड झाला आहे. 

रस्त्याचे पावसाने डबके झाले आहे, पाण्याचा निचरा व्हायला गटार नाही. शाळेत जाणारे विद्यार्थी चिखलात पडत आहेत, जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडवत आहेत, तरी या बांधकाम अभियंत्याला पाण्याचा निचरा कसा होईल याची बुद्धी होत नाही!

सामान्य जनता खड्ड्यांनी त्रस्त असताना रोहानगर पालिकेच्या नगर अभियंत्यानी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. मर्जीतील विकासकांसाठी (बिल्डर) नगरपालिकेचे कोट्यावधी रुपये उधळत आहे. शहरात सध्या सुरू असलेल्या एका मोठ्या नाल्याचे आरसीसी कॉंक्रिटीकरण आणि त्यावर भलामोठा स्लॅब बांधकाम करुन देत आहे. यात कुणाचे हित आहे हे उघड आहे. यापूर्वी नगरपालिकेने कधीही नाल्यावर स्लॅब बांधकाम केल्याचे आढळून आले नाही. रोहा न. प. नगर अभियंत्याची सगळी निष्ठा या बिल्डरांच्या पायाशी लोळण घेत आहे. 

सर्व सामान्य नागरिक टॅक्स भरतात, मात्र त्यांच्या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. काही विकासक नियम धाब्यावर बसवून बांधकाम करत आहेत, रोहा न. प. नगर अभियंता मुग गिळून गप्प बसले आहेत. 

अवैध काम करणाऱ्यांना कसल्याच प्रकारचा धाक नाही. त्यामुळे अनेकांनी आपले धंदे बंद ठेवले आहेत. टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मुलभूत सुविधांशी घेणंदेणं नसलेल्या नगर अभियंत्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog