कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव कार्यक्रम संपन्न

रोहा : प्रतिनिधी

कुंडलिका  सहकारी पतसंस्थेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच सभेपुर्वी दरवर्षीप्रमाणे पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व रोहा परिसरातील विशेष कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याकरिता श्री. रविंद्रजी माधव साठे (सभापती-महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि विद्यावाचस्पती डॉ. प्राची साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनोख्या शैलीमध्ये श्री. साठे विद्यार्थी उपस्थित सभासद व पालक यांच्याशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले. संस्थेने उत्तम कारभार करून ठेवी भागभांडवल, निधि व उलाढाल उत्तमरित्या वाढवली आहे असे गौरवोद्वार, रविंद्रजी साठे यांनी काढले, साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  समाजसेवा, देशसेवा कशी करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्राची साठे यांनी विद्यार्थ्यांना  अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे छंद जोपासण्याबाबत मार्गदर्शन केले.

सम्मान सोहळ्यात सत्कारमूर्ति म्हणून रोहयात शिक्षण घेवून चित्रपट, नाटक, व वाहिन्यांवरील मालिकांतून घरोघरी मोहन अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे कु. संकेत अविनाश कोर्लेकर, तसेच शैक्षणिक क्षेत्राची चौफेर सेवा, अनेक पुस्तकांचे, प्रवेशाचे लेखन, राष्ट्रीय सेवा योजनेत महत्वाचे योगदान असणारे  तुळशीदास पांडुरंग मोकल व जेईई अॅडव्हान्स सारख्या बुद्धीचा कस लागणाच्या परीक्षेत दुर्मिल यश मिळविल्या बद्दल कु. वेदांत महेश्वर भिसे, तसेच विशेष प्राविण्य मिळालेले कु सुमित सुहास जोशी (एम.ए मध्ये मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक), कु. निवेदिता महादेव जाधव (बॅचलर ऑफ ला) कु. विवेक बलराज (बी.ई.सिविल), कु. द्रुती लाड (नॅशनल बॉक्सींग गोल्ड मेडल), कु. प्रथमेश गर्जे (जलतरण फ्री स्टाईल), श्रीया सुनिल माखितकर (जिल्हास्तरीय वाकस्पर्धा), स्वरा कैलास खरीवले (तालुकास्तरीय आरबीआय फायनानशियल लिटरेसी एक्झम) शाक्य अजय गायकवाड (जिल्हास्तरीय आरबीआय फायनानशियल लिटरेसी एक्झॅम), मनस्वी मांजरेकर (इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय), पायल हरिश्चंद्र लेंडी (आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती), नुपूर परशुराम वारगुडे (आर्थिक) मागास शिष्यवृत्ती), आणि इतर गुणवंत विद्याध्यांचा सत्कार करण्यात आला,

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक . अशोक जोशी यांनी केले, सदर कार्यक्रमात प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष  चंद्रशेखर जोशी यांनी संस्थेला बैंको क्यु रिबन पुरस्कार मिळाल्याबद्दल माहिती दिली व त्याचे श्रेय सर्व सभासदांस दिले. तसेच विद्यार्थ्यांना बोधपर गोष्ट सांगून मार्गदर्शन केले.

वार्षिक सर्व साधारण सभेत तज्ञ संचालक. अविनाश दाते यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. कुंडलिका नागरी सहकारी संस्थेने सभासदांना १५% लाभांश जाहीर केला. अध्यक्ष  चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष  विवेक वत्सराज व तज्ञ संचालक  अविनाश दाते यांनी अहवालातील मुद्यांवर विवेचन केले, तसेच सभासद गजानन मळेकर, . वत्सराज सर प्रदीप चव्हाण,  समीक्षा पांचाळ,  यांनी चर्चेत सहभाग घेतला. संचालिका जयची भांड यांनी आभार प्रदर्शन केले व वंदेमातरम गायनाने सभेची सांगता झाली.

Popular posts from this blog