धाटाव औद्योगिक विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षा निकाल १०० टक्के
रोहा : किरण मोरे
प. पु. पांडुरंग शास्त्री आठवले धाटाव औद्योगिक विद्यालयाचा यावर्षी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेत ३८ पैकी ३८ विद्यार्ध्यांनी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचे व संस्थेचे नाव उंचावले.
या विद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी कु. प्रिया सहदेव शिंदे (७८.६०%), कु. अनुष्का उमेश बाकडे (७७.४०%), कु. सुजल विश्वास म्हसकर (७६.००%), कु. श्रावणी युवराज वाडते (७६.००%), कु. मोहिनी नवनाथ तळेकर (७४.८०%), कु. साक्षी बाळू बोरूडे (७४.८०%), कु. स्नेहा महादेव साबळे (७३.२०%) या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे यश मिळविले. संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.