केंद्रशासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत रोहा तालुक्यातील १०० कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात! 

उच्चस्तरिय चौकशी होण्याच्या मार्गावर! 

रोहा : किरण मोरे 

केंद्रशासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत रा.जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग रोहा यांच्या कार्यक्षेत्रात नळपाणी पुरवठा योजनेकरिता एकूण १४० कामांचे १०० कोटी रू. चे टेंडर भरण्यात आल्याचे प्रशासकीय माहितीद्वारे निष्पन्न झालेले आहे. 

विशेष म्हणजे या कामांकरिता काही ठेकेदारांनी १३ कोटी, ८ कोटी, ७ कोटी... अशा अवाढव्य रक्कमेचे टेंडर भरलेले आहे. तसेच ही कामे प्रगतीपथावर असल्याचे फक्त कागदोपत्री दर्शविण्यात आलेले आहे. परंतु वस्तुस्थिती पाहता येथे कोणत्याही प्रकारे कामाची प्रगती झालेली नाही. अर्थात, लाईन आऊट देखील देण्यात आलेले नाही. संबंधित ठेकेदारांना काम सुरू करण्याबाबत ४ ते ५ नोटीस देऊन देखील ही कामे सुरू करण्यात न आल्याने येथे मोठा "घोटाळा" होण्याची चिन्हे दिसू लागली असून येथे शासनाच्या निधीचा गैरवापर होण्याच्या मार्गावर आलेला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला असून प्रत्येक ठेकेदाराची उच्चस्तरिय चौकशी करून यांतील दोषींना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog