टाटा पॉवर भिरा व निरामय हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

पॉवर भिरा यांच्या टाटा क्लब मध्ये टाटा पॉवर भिरा व निरामय हेल्थ फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भिरा डिव्हिजन प्लांटचे मुख्य अधीकारी अजय कुण्णूर, निरामय हेल्थ फाउंडेशन च्या सी. एस. आर त्रिवेणी व भाग्यश्री माहेर ग्राम संघाच्या अध्यक्ष्या मनीषा मोरे, धागा सेंटर भिरा च्या अध्यक्ष्या नीलिमा बेलोसे, पाटणूस ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा बांदल, रिया निगडे अंगणवाडी सेविका कमल बेलोसे व मदतनीस,माहेर संघाच्या सदस्या व पाटणूस पंचक्रोशीतील शेकडो महिला बहु संख्येने उपस्थित होत्या. 

यावेळी महिलांमध्ये विविध प्रकारचे गेम खेळविण्यात आले त्यास महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. महिलांमधून 123 या प्रमाणे नं काढण्यात आले त्यांना त्याच ठिकाणी योग्यते प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले. गेम मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महिलेला प्रोत्साहन म्हणून त्यांना सुद्धा बक्षीस देण्यात आले. 

अध्यक्ष अजय कुण्णूर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज प्रथमच इतक्या संख्येने जमलेल्या महिला भगिनी पाहून आपण खूपच प्रभावीत झालो आहे. तसेच मी सर्व महिला भगिनींना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो.महाराष्ट्र शासनाने महिलांना एस. टी. तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिल्याने मी सर्व महिलांचे अभिनंदन करतो तसेच या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन महिलांनी खाजगी वाहनांमध्ये प्रवास करण्या ऐवजी जास्तीत जास्त एस. टी. बस मधून प्रवास करून महाराष्ट्र शासनाचा आदर करावा.

Popular posts from this blog