हि. म. मेता माध्यमिक विद्यालय विळे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप 

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

शुक्रवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी पोस्को कंपनीच्या वतीने हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालय व स्वा सै.ध.भि. मोदी उच्च माध्यमिक विद्यालय विळे, ता. माणगांव येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य ,खाऊ वाटप करण्यात आले व सदर कार्यक्रम हा हारमन ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक मनिंदर सिंग जी उर्फ मननुजी साहेब यांच्यावतीने करण्यात आला या शैक्षणिक साहित्यामध्ये दप्तर ,पेन्सिल बॉक्स, पेन बॉक्स ,कंपास ,पाणी बॉटल इत्यादी बाबी असून त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत पुढील शैक्षणिक वर्षासाठी 51 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी श्रीयुत हारमन ट्रान्सपोर्ट यांचे वतीने गणवेशासाठी 25 हजार व इतर शालेय कामकाजासाठी 25 हजार देणगी देण्यात आली आहे यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष भाई मेता उपाध्यक्ष श्री प्रकाश भाई मेहता , मुख्याध्यापक श्री ठाकूर सर उपसेक्रेटरी श्री बामणे साहेब, कार्याध्यक्ष श्री पांडुरंग नलावडे व संस्था चालक श्री ताम्हणकर साहेब हे उपस्थित होते कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीयुत सांगुलीकर साहेब हे मुख्य अतिथी होते त्यांनी विद्यार्थ्यांना कोरिया व भारत यांच्या जुन्या संबंधांबद्दल सांगितले श्रीयुत कांबळे सर यांनी सूत्रसंचालन केले श्री सुधीर भोसले साहेब यांनीही मुलांना मार्गदर्शन केले यावेळी विनायक बाईत व दीपक ढवन यांचेही विशेष सहकार्य लाभले त्यावेळी शाळेसाठी विज्ञान प्रयोगशाळा व विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा करण्याची मागणी केली शेवटी श्रीयुत घोरपडे सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला.

Popular posts from this blog