निजामपूर येथे बेकायदा मटका-जुगाराचा धांगडधिंगा, पोलीस लाखो रूपयांचा हप्ता घेऊन झालेत लाचार? 

निजामपूर येथील पोलीसांना गृहमंत्र्यांनी पगारवाढ करणे आवश्यक? बेकायदा मटका जुगारावरच पोलीसांचा होतोय उदरनिर्वाह? 

पोलीसांना प्रचंड हप्ता असल्यामुळे निजामपूर येथे तीन ठिकाणी बेकायदा मटका-जुगार राजरोसपणे सुरू 

माणगांव : प्रतिनिधी 

सध्या माणगांव-निजामपूर रोड आणि निजामपूर परिसर येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून येथील अवैध धंद्यांकडून लाखो रूपयांचा हप्ता घेऊन येथील पोलीस लाचार झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस दलाकडून मिळणाऱ्या वेतनातून येथील पोलीसांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्यामुळे येथील "पोलीसांवर हप्ता घेण्याची नामुष्की आल्याची एकच चर्चा या परिसरात रंगली आहे.

माणगांव शहरामध्ये माणगांव-निजामपूर रोडलगतच गावडे बिल्डींग येथे पोलीसांच्या आशिर्वादाने बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून निजामपूरमध्ये तर कहरच झालेला आहे. निजामपूरमध्ये एकूण तीन ठिकाणी बेकायदा मटका-जुगार सुरू असून येथील पोलीस 'हप्ता किंग' बनल्याचे दिसत आहेत. यापूर्वीही निजामपूरमध्ये एका 'नवशिक्या' पोलीस अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने मटका-जुगाराचा धंदा सुरू होता. या पोलीस अधिकाऱ्याचा स्टाईल पाहता तो स्वतःला देशातील सर्वात मोठा अधिकारी समजून जास्त हवेत उडायला बघत होता, परंतु "न्यूज २४ तास" ने त्या पोलीस अधिकाऱ्याला चांगलाच दणका देऊन येथील बेकायदा धंदे बंद करायला लावले होते. परंतु आता तर येथे पुन्हा तीन ठिकाणी बेकायदा मटका सुरू झाल्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, तसेच रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन माणगांव शहरातील निजामपूर रोड येथील एक मटका-जुगाराचा धंदा आणि निजामपूर येथील तीन मटका जुगाराचे धंदे तातडीने बंद करावेत अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog