विळे वरची वाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील वरची वाडी (विळे) येथे डॉ. मोदी यांचे दवाखान्यात गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी राऊत आय केयर माणगांव-रायगड यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या ठिकाणीच नागरिकांना अल्प दरात नंबरचे चष्मे सुद्धा उपलब्ध करण्यात आले होते.
शिबिराचे वैशिष्ट म्हणजे या शिबिरात तज्ञ डॉक्टर यांचे कडून डोळ्यांची तपासणी करण्यात आली. कॉम्पुटराईज नेत्र तपासणी, मोतीबिंदू, कचबिंदू निदान व अल्प दरात शस्त्रक्रिया इत्यादी सुविधा नागरिकांसाठी या शिबिरात ठेवण्यात आल्या होत्या.विळे पंचक्रोशी, पाटणूस पंचक्रोशी, भागाड, तासगाव,बेडगाव, सणसवाडी, साजे -रवाळजे इत्यादी परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन लाभ घेतला.माणगाव चे सु प्रसिद्ध डॉ. राऊत यांच्या कन्या डॉ. स्नेहा राऊत व त्यांचे सहकारी यांनी शिबिरात नागरिकांना उत्तम सेवा दिली. त्यांना कु. अंकिता, कु.श्वेता, सौ. नूतन मोदी, सौ. वंदना मेथा, राकेश शेट, प्रसाद मेथा, दिनेश शेट यांनी उत्तम सहकार्य केले तसेच डॉ. नितिन मोदी यांनी या शिबिरासाठी आपला दवाखाना उपलब्ध करून दिला. यापूर्वी सुध्दा अनेक प्रकारची आरोग्य शिबिरे डॉ. मोदी यांनी आयोजित केली आहेत ज्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. पुढेही भविष्यात अश्या परकारची आरोग्य शिबिरे आपण आयोजित करू असे डॉ. नितिन मोदी यांनी सांगितले. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नेत्र शिबीर आयोजित करण्याचा डॉ. स्नेहल राऊत यांचा मानस आहे.