जय बजरंग सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारु।श्रीमंत योगी। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जय बजरंग सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाचे शिवजयंतीचे हे दुसरे वर्ष असून शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या भव्य मिरवणुकीत पारंपरिक पोशाखात असणारी लहान मुले, शिवभक्त, शिवकन्या, गावातील महिला लेझिम खेळत वाजत गाजत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत जय बजरंग सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीमध्ये साजरी करण्यात आली. विळे वरचीवाडी गावातील शिवप्रेमीं मिरवणूक सोहळ्यात मोठ्या संख्यने उपस्थित होते.