कोलाड येथे कुणबी जोडो अभियनास समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

कोलाड : प्रतिनिधी 

कोकणातून सुरु झालेल्या कूंणबी जोडो अभियान यात्रेचे रायगडात तर जोरदार स्वागत झालेच परंतु ज्या कोलाडच्या मातीत कुंणबी समाजाची पाळेमुळे रुजली गेली त्या स्वर्गीय आमदार पा.रा. सानप यांच्या पुण्य भूमीत ढोल ताशाच्या गजरात लेझिम पथकाद्वारे  या कुंणबी जोडो अभियाण यात्रचे जोरदार व जल्लोष पुर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले .

यावेळी उपस्तीत कुणबी युवा वर्गाची बूलंद तोफ कुंणबी राजकिय संघटन प्रमुख. अशोकजी वाळंम, संघाचे अध्यक्ष भुषणजी बरे. कोबनाक साहेब, माणगाव नगराध्यश पवार, समाज नेते शंकरराव म्हसकर, शिवराम शिंदे, सुरेशजी मगर, शिवराम महाबळे सरपंच सुरेशदादा महाबळे विष्णू भाई लोखंडे, रामचंद्र सकपाळ, मंगेशजी सानप, सागर सानप, माधव आग्री, या सर्वांचे स्वागत कोलाड कुंणबी युवक अध्यक्ष संदेशजी लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजकारणात विखुरलेला समाज सामाजिक दृस्ठ्या एक व्हावा याकरिता आशोक वाळम यांच्या नेतृत्वाखाली कुणबी जोडो अभियान 7 जिल्ह्यात राबविला जात आहे. केवळ सामाजिक पदावर न राहता आपला कुणबी बांधव राजकारणात ही पुढे गेला पाहिजे तरच आपले प्रस्न हक्कांने सुटतील असे मार्गदर्शन यावेळी प्रमुख मान्यवरानी केले.तर कोलाडात कुणबी बांधवांची उपस्थिती पहाता खरोखर समाज जागृत झाल्याचे दिसत होते. त्यामूळे कुणबी समाजातील जेष्ट पधाधिकारी व युवक पधाधिकारी यांच्याकडून समाज बांधवांच्या सामाजिक अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

गेली 2 वर्ष कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष संदेशजी लोखंडे व सर्व पदाधिकारी हे कुणबी संघटन वाढवन्याकरिता खुप मेहनत घेत आहेत. कोलाडात मधला काही काळ समाज संघटनेला मरगळ आली होती. मात्र सामाजिक संघटन हे गरजेचे आहे पुढच्या पिढीने देखील सामजिक वारसा जपावा याकरिता तरुणवर्ग एकत्र येत. युवक अध्यक्ष संदेशजी लोखंडे व युवा कार्यकर्ते यानी समाजाची विस्कटलेली घडी बसविण्यात त्याना यश आले आहे. आमदार पारा सानप यांची जयंती, कुणबी मेळावा, महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम, ओबिसी मोर्चा सहभाग व आता गाव तेथे कुणबी शाखा असे विविध उपक्रम हाती घेतांना दिसत आहेत.

रोहा तालुक्यात असलेला 70 टक्के कुणबी समाज हा सामजिक , राजकिय, शैक्षणिक मधे मागे राहू नये. भावी पिढीला सामजिक संघटनेकडून मार्गदर्शन मिळावे, कुणबी समाज जनजागृती व्हावी. कुणबी बांधवांचे प्रस्न सुटावेत .या करिता कोलाडात युवकांचे सामजिक संघटन उभे राहात असुन  जेष्ट नेत्यांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळत असल्याचे  युवक अध्यक्ष संदेशजी लोखंडे यानी सांगितले.

Comments

Popular posts from this blog