न्यूज 24 तास मराठी... WEB NEWS... घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे... मराठी बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ... न्यूज 24 तास मराठी... WEB NEWS... घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे... मराठी बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ... न्यूज 24 तास मराठी... WEB NEWS... घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे... मराठी बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ... न्यूज 24 तास मराठी... WEB NEWS... घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे... मराठी बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ...
🚨 महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर : रणजीत पांडुरंग मस्के... 🚨 रायगड क्राईम रिपोर्टर : सुरेश नारायण तांडेल (ता. पनवेल)... 🚨
भिसे खिंडीत कोसळले महाकाय झाड! नागोठणे-रोहा मार्ग पूर्णपणे ठप्प प्रवाशांचे प्रचंड हाल बेणसे-रायगड, दि. ५ (चंद्रकांत अडसुळे) :- गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागोठणे ते रोहा दरम्यान असलेल्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या भिसे खिंडीत रस्त्यावर एक महाकाय झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. हे झाड थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामुळे नागोठणे आणि रोहा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुख्य संपर्क तुटला असून, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे खिंडीतील डोंगराळ भागातील माती भुसभुशीत झाली होती, ज्यामुळे हे जुने आणि मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. झाड पडले त्या वेळी सुदैवाने रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी रस्त्याचा मोठा भाग या झाडामुळे आणि सोबत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे वेढला गेला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक एसटी बसेस, खाजगी वाह...
भिसे खिंडीत झाड व मातीचा ढिगारा कोसळल्याने वाहतूक ठप्प! पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू अनेक झाडे धोकादायक नागोठणे-रायगड, दि. ५ (महेंद्र माने) :- नागोठणे शहर आणि परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोठणे-रोहा मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या मार्गावरील भिसे खिंडीत, आमडोशी फाट्याजवळ रविवार, ५ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक मोठे झाड आणि मातीचा प्रचंड ढिगारा अचानक रस्त्यावर कोसळला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जेसीबी (JCB) यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचे आणि साचलेली माती साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तात्काळ सुरू केलेल्या या मदतकार्यामुळे लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात येईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी...
Comments
Post a Comment