🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

दिशा क्रिकेट अकॅडेमी रोहा तर्फे रोहा T20 जूनियर चॅम्पियनशिपची सुरुवात 

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी

दिशा क्रिकेट अकॅडेमी रोहा तर्फे रोहा T20 जूनियर चॅम्पियनशिप 14 वर्षे वयोगटातील क्रिकेट स्पर्धेची दमदार सुरुवात झाली. 

उद्घाटन प्रसंगी कोलाड पोलीस स्टेशन मधील नरेश पाटील, एम डी एन फ्युचर स्कूलचे व्यवस्थापक देवेंद्र  सर, प्रकाश मेस्त्री, मयूर पडवळ, सागर सोनी, अतुल पाटील तसेच दिशा क्रिकेट अकॅडेमी चे अध्यक्ष सुरेन्द्र भातीकरे, दिशा क्रिकेट अकॅडेमी चे कोच महेंद्र भातीकरे, एफ सी ए माणगाव संघाचे कोच रोहित काळे सर,  क्रिकेट खेळाडू तसेच दिशा क्रिकेट अकॅडेमीचे विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांची लक्षणीय उपस्थिती होती. वरील सर्वांनी ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व दिशा क्रिकेट अकॅडेमीला पुढील वाटचाली साठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सर्व मान्यवरांनी आश्वासन दिले. 

क्रिकेट खेळाडूंचा उत्साह पाहता आशा स्पर्धा नियमित एम डी एम फ्युचर स्कूल कोलाडच्या  मैदानावर भरविल्या जातील असे आश्वासन दिशा क्रिकेट अकॅडेमी चे अध्यक्ष सुरेन्द्र भातीकरे यांनी दिले. पहिला सामना एफ सी ए माणगांव विरुद्ध दिशा क्रिकेट अकॅडमी ए रोहा असा झाला. ह्या सामान्यांमदे अतिशय चुरशीचा खेळ पाहायला मिळाला ज्यामध्ये एफ सी ए माणगांव संघाने 13 धावांनी रोमांचक विजय मिळवला. 

ह्या सामन्यात  दिशा क्रिकेट अकॅडमी ए  रोहा संघाकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रचीत डांगे तसेच एफ सी ए माणगांव संघाकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ऋग्वेद जाधव यांना गौरवण्यात आले. पराजित संघामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिशा क्रिकेट अकॅडमी ए  रोहा संघाचा स्वरूप शेलार ह्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या व त्याला फाईटर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. विजयी संघ एफ सी ए माणगांव मधून अथर्व खांडेकर याने केलेल्या अष्टपैलू कामगिरी करत त्याला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आले. अथर्व खांडेकर ह्याने 55 धावांची खेळी केली आणि 2 विककेट्स घेतल्या.

Comments

Popular posts from this blog