🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रानडुकराची शिकार करणाऱ्यांना अटक, रोहा येथे वनविभागाची धडक कारवाई

रोहा : प्रतिनिधी 

रानडुक्कराची शिकार करून त्याचे मांस बॅगांमध्ये भरून जात असलेल्यांना रोहा वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री. मनोज तुकाराम वाघमारे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा व संजय चव्हाण वनपाल रोहा, निलेश वाघमारे वनपाल गोफण, विकास राजपूत वनरक्षक रोहा, वैभव बत्तीसे वनरक्षक ताम्हणशेत, निखिल पाटील वनरक्षक वावेपोटगे, मोरेश्वर भगत वनमजुर यांच्या समवेत मौजे लांढर कं.नं.286 मध्ये गुप्त बातमीवरून फिरती करत असताना आरोपी इसम 1 महादेव कुशा पिंगळा व त्यांचे पळून गेलेले सहकारी 3 यांनी रानडुकराची शिकार करून डुकराचे मांस ब्लांकेटमध्ये तसेच दोन पाठीवरील बॅगांमध्ये भरलेले डुकराचे मांस पकडले. सदरील मांस जप्त करून तसेच डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणारे हत्यारे व होंडा शाईन मोटार सायकल क्र.MH 06 BT 6605, होंडा शाईन मोटार सायकल क्र.MH 06 CE 8897तसेच आरोपी 1 पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. पंचनामा कागदपत्र तयार केली व भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 9,50,51 भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) चे उल्लघन केल्याने परिमंडळ रोहा रा.गु.न.WLF-01/2022-23 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर वनगुन्हा प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

Comments

Popular posts from this blog