किल्ला येथे बेकायदेशीर माती उत्खनन, जेसीबी आणि डंपर वनविभागाकडून जप्त!
रोहा : प्रतिनिधी
शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वनेत्तर कामे करण्यास बंदी असताना देखील रोहा तालुक्यातील किल्ला येथे बेकायदेशीरपणे माती उत्खनन सुरू होते. सदर बेकायदेशीर माती उत्खनन करताना जेसीबी व डंपर वनविभागाकडून जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी उप वनसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री . विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मनोज वाघमारे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा व वनपाल रोहा, गोफण वनरक्षक रोहा, तम्हणशेत, धामणसई, पहूर यांच्या समवेत मौजे किल्ला मा.ग.नं.111 मध्ये केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय वनेत्तर कामास बंदी मध्ये बेकायदेशीर माती उत्खननाचे काम चालू असताना जेसीबी क्रमांक - MH-06/AL-7165, डंपर क्रमांक MH-05/AM-0749,MH-06/AC-6606 व MH -06/AG-6608 यांना जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927चे कलम35(1)(7) चे उल्लघन केल्याने परिमंडळ रोहा रा.गु.न. ई -01/2022-23 दिनांक -11/12/2022 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर वनगुन्हा प्रकरणी पुढील तपास चालू आहे.