🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

डॉ. सागर सानप यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान 

कोलाड : प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र डॉ. सागर विठोबा सानप यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देण्यात आला.

डॉ. सागर सानप हे कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष असून ते मुंबई कुणबी समाज, रायगड जिल्हा कुणबी समाज, रोहा तालुका कुणबी समाज,ओबीसी समाज या संघटनेत समाज हिताचे काम करीत आहेत. या सामाजिक कार्याची दख्खल घेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबाफुले यांच्या स्मुतीदिनाचे औचित्य साधून राजेर्षी शाहू स्मारक भवन,मुख्यसभागृह कोल्हापूर येथे डॉ. सागर सानप यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देण्यात आला.

यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रा.डॉ.राजेखान शानेदिवाण जेष्ठ साहित्यिक व विचावंत,खासदार धैर्यशीलदादा माने, खासदार निवेदिता माने, डॉ.सुरेशराव जाधव, विजय कांबळे, डॉ.अरुण भोसले, डॉ. राजेंद्र दास, प्रा.डॉ.प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मिले, सुरज वाघमारे यांच्या शुभहस्ते डॉ. सागर सानप यांना हा  पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काबद्दल कोलाड रोहा लायन्स क्लब,मुंबई कुणबी ग्रुप, रायगड जिल्हा कुणबी ग्रुप, रोहा तालुका कुणबी ग्रुप व संपूर्ण ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी डॉ. सागर सानप यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog