🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

टाटा पॉवर भिरा कंपनी जलाशय नियंत्रण द्वार प्रकल्प उभारणार

रायगड मतदार संघाचे खासदार श्री सुनील तटकरे आणि महाड-माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते रवाळजे उन्नयी धरणावर प्रकल्प स्थळी भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायत हद्दीत भिरा येथे टाटा पॉवर कंपनीचे 300 मेगावॅट स्थापित क्षमतेचे जलविद्युत निर्मित्ती केंद्र आहे. त्यापैकी 150 मेगा वॅट क्षमतेचे पुंरनिर्मितीक्षम उदंचन संच आहे ज्या द्वारे कोकणातील पाणी उपासा करून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर (सुमारे 1500 फूट उंचीवर) मुळशी धरणामध्ये साठवता येते आणि त्यानंतर तेच पाणी वापरून पुन्हा वीज निर्मिती करता येते.तथापि सदरहू संच उपसा प्रणालीमध्ये कार्यान्वित कारण्याकरिता रवाळजे येथील निम्न जलाशयामध्ये आवश्यक किमान पाणी पातळी उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून हा संच केवळ पारंपारिक पद्धतीनेच कार्यान्वित आहे. या तांत्रिक अडचणी वर मात करण्यासाठी रवाळजे येथील जलाशयातील विद्यमान भूमिगत बोगद्याच्या मुखाशी नियंत्रण द्वार उभारणी प्रकल्प टाटा पॉवर भिरा कंपनी तर्फे हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या भूमी पूजनाचा समारंभ रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री सुनील तटकरे आणि महाड - माणगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भरात शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते रवाळजे उन्नयी धरणावर प्रकल्प स्थळी संपन्न झाला.

यावेळी आमदार भरत शेठ गोगावले यांनी सदरहू प्रकल्पाची पार्शवभूमी देऊन या प्रकल्पाच्या रूपाने आपल्या तालुक्यात उद्योग आल्याने त्याबरोबरच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्याने टाटा कंपनीचे आभार मानले आणि स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याच्या सुचना केल्या. खासदार श्री सुनील तटकरे यांनी ब्रिटिश काळात या अति दुर्गम अशा सह्याद्रीच्या कातळ खोऱ्यात त्या काळच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टाटांनी दूरदृष्टीने जे जलविद्युत केंद्राची उभारणी केली त्याचे आजच्या काळात कोळशावर आधारित औषणिक केंद्रामुळे जे प्रदूषण होत आहे आणि पर्यायाने रोगराई पसरत आहे त्यावेळी असे पर्यावरण असणारे जलविद्युत केंद्राचे महत्व प्रकर्षाने ध्यानात येते. टाटांचे कोविड काळातील 1000 कोटींच्या मदतीच्या रूपातील हि औदार्याची भूमिका हे माणुसकीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. कंपनीचे प्रकल्प रबवितेवेळी कुंडलिका सतत अशीच बाराही महिने वाहत राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. टाटा कंपनी ने देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये असेच उत्तरोत्तर योगदान देत राहावे अशी आशा व्यक्त करून कंपनीच्या प्रकलपास शुभेच्छा व्यक्त केल्या. 

टाटा कंपनीचे जलविद्युत विभागाचे प्रमुख श्री प्रभाकर काळे, भिरा जलविद्युतचे प्रमुख श्री अजय कोण्णूर, सरपंच रवाळजे सौ. लाड, पाटणूस ग्रामपंचायत सरपंच सौ. नीलिमा निगडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सौ. राजभोग मॅडम, व महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता या वेळी उपस्थित होते. तसेच महाड -माणगाव मतदार संघाचे (राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष) बाबू खानविलकर, माणगांव तालुक्याचे माजी उपसभापती आप्पा म्हामुणकर, निजामपूर विभाग महिला अध्यक्षा देविका पाबेकर तसेच परिसरातील अनेक मान्यवर मंडळी, बहुसंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. टाटा कंपनीचे धरण प्रमुख तथा हेड इस्टेट लीगल श्री बसवराज मुन्नोळी यांनी सूत्र संचलन केले.

Comments

Popular posts from this blog