www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com

रायगड मधून 9 ते 13 वयोगटातील मुले जापान कराटे स्पर्धेसाठी वसई येथे रवाना 

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस, विळे परिसरात 9 ते 15 वयोगटातील मुलांना जापान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने जापान कराटे चे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण सुरू असताना या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी नेले जाते स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना कराटे मध्ये महारथ प्राप्त झालेल्या प्रशिक्षणार्थींकडून मार्गदर्शन केले जाते. यावेळी या कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या बालकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. ज्याप्रमाणे या कराटे विद्यार्त्यांची प्रगती होईल त्या प्रमाणे त्यांना ग्रीन बेल्ट, यलो बेल्ट, ब्राऊन बेल्ट व अन्य प्रकारचे बेल्ट देत असताना जो विद्यार्थी कराटेमध्ये तरबेज होईल त्याला अत्यंत महत्वाचा असा ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात येतो. 

पाटणूस, विळे येथे या विद्यार्थ्यांना अमर यादव, परेश शाह, नवाझ आलम, समर्थ यादव हे शिक्षक प्रशिक्षण देत असून या शिक्षकांच्या सोबत 13 विद्यार्थी, विद्यार्थिनींची टीम दि. 3 डिसेंबर 2022 रोजी वसई येथे रायगड जिल्ह्याच्या वतीने रवाना झाले आहेत. टीम मध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे या प्रमाणे :

पूर्वा दिपक तवटे, दिसती चंद्रशेखर माऊळकर, निधी काशिनाथ सुतार, तेजस्वी अमर खांडेकर, हितेश मंगेश बेर्डे, अहिल अजमीर मुलाणी, विराज विकास चव्हाण, विधी कृष्णा शेळके, साक्षी राजू जाधव, प्रेक्षा अमर यादव, वृषभ पांडुरंग बावधाने, समीक्षा बबन बावधाने, श्लोक सुभाष म्हामुणकर. इत्यादी. विळे पाटणूस परिसरातील या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवावे म्हणून पाटणूस, विळे परिसरातून नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog