कोलाड नाक्यावर वनविभागाची धडक कारवाई
विनापरवाना इंजायली किटा वाहतूक करणारा वाहतूक करणारा टेंपो पकडला
15 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त
रोहा : प्रतिनिधी
कोलाड नाक्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून विनापरवाना इंजायली किटा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून 15 लाख 95 हजार 257 रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे.
उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.मनोज तुकाराम वाघमारे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा व अंगद भोसले वनरक्षक तपासणी नाका कोलाड, राजेश थळकर वनपाल कोलाड व स्टाफ यांनी मिळालेल्या गुप्त बातमी वरून मुंबई गोवा राज्यमार्ग क्र.६६ वर कोलाड येथे दापोली वरून नागोठणे कडे जाणारी आयशर क्रमांक MH/08/AP/4783 ची तपासणी केली असता इंजायली किटा 25.740 घ.मी. किंमत 20257/- रुपये व जप्त वाहन क्रमांक MH/08/AP/4783 अंदाजे किंमत 15,75000/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व इंजायली किटा असा एकूण एकंदर 1595257/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी गाडी चालक श्री सौरभ जयदास जाधव राहनार दापोली, जि, रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.