कुणबी युवक मंडळ मुंबई तर्फे सरपंच वसंत भोईर यांचा नागरी सत्कार
कोलाड नाका : प्रतिनिधी
कुणबी समाज उन्नती संघ मुंबई च्या कुणबी युवक मंडळ मुंबई तर्फे देवकान्हे गावचे सुपुत्र वसंत तानाजी भोईर यांची सरपंच पदाच्या उत्कृस्ट कामगीरी बद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम हा दीनानाथ नाट्यगृह मुंंबई येथे घेण्यात आला होता. यावेळी मुंबई संघाचे चंद्रकांत जी बावकर , ओ,बी,सी महारास्ट्र अध्यक्ष अण्णा भाऊ शेडगे, श्री डाफले श्री म्हातले,मारुती काका जोशी श्री दुसार साहेब ,कूंणबी युवक मंड़ळ अध्यक्ष माधव कांबळे डॉ मंगेश सानप, डॉ सागर सानप,सुनिल ठाकुर, शाखा प्रमुख माधव आग्री, शरद गंभे, बाळा महाबळे,तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे पालघर,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्याच्या वतीने वसंत भोईर यांचा सत्कार करण्यात आला.
वसंत भोईर हे देवकान्हे सारख्या ग्रामीण भागातील गावातून कुणबी समाजात जन्माला आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थीतून ते पुढे आल्याने गरिबीची जान असल्याने ते सरपंच पदाच्या माध्यमातून गावची सेवा करित आहेत. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात पाहिल्या क्रमांकाची मते त्याना मिळाली होती. त्यांची रायगड जिल्ह्यात नामवंत शाहीर म्हणून विशेष ओळख असल्याने ते सर्वाना परिचयाचे आहेत. अतिशय नम्र व थोरा मोठ्यांपासुन लहाना पर्यन्त दादा ही हाक मारणे हा त्यांचा स्वभाव त्यांच्या अंगी असलेली विनम्रता दाखवुन देते. गोरगरिबाच्या मदतीला धावणे व अंगी दानत असल्याने त्यांच्या सामजिक राजकिय कार्याची दखल घेत त्याना आदर्श रायगड सरपंच पुरस्कार व गोवा राज्याचा पुरस्कार,देखील मिळाला आहे.
कुणबी समाजातील वसंत भोईर यानी राजकिय,सांसकृतिक, व सामजिक कामाच्या माध्यमातून समाजाचे नाव सातासमुद्र पार पोहचवल्याने त्यांचा कुणबी युवक मंडळा तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. वसंत भोईर यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.