🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

आमदार रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते पूर्व कुडली (ता. रोहा) सभागृह कामाचा शुभारंभ

रोहा : प्रतिनिधी

आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील पूर्व कुडली येथील मारुती मंदिर काम पूर्व कुडली ग्रामस्थांनी हाती घेतलं आहे पररंतु निधी अभावी काम होत नव्हतं

गावातील कार्यकर्ते आणि पेण रोहा सुधागड मतदार संघांचे आमदार रवीशेठ पाटील यांच्याकडे पूर्व कुडली ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. आमदार रवीशेठ पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ घेऊन 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला त्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ नेते विष्णू मोरे यांनी प्रास्ताविक केले.

आमदार रवीशेठ पाटील यांनी बोलताना म्हटले की, स्थानिक विभागात खासदार आमदार माजी पालकमंत्री असताना सुद्धा हा भाग दुर्लक्षित राहील कित्येक वर्ष सत्ता असताना सुद्धा विकासकामे राखडलेली आहेत मी कुडली गावाला यापुढे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.

या आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात मी विकासनिधी देतोय पण स्थानिक राष्ट्रवादी चे पुढारी आपल्या आमदार खासदार यांच्यामुळे NOC देत नाहीत ही वस्तूस्तिथी आहे. तरी पण आपण या विभागात निधी देतोय जेथे NOC मिळते तेथे विकासकामे होतायत.

यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांच्या समवेत भाजपा जेष्ठ नेते, मारुती देवरे, विष्णू मोरे, तानाजी आप्पा देशमुख, बबलूशेट सय्यद, तालुका मंडळ अध्यक्ष सोपान जांभेकर, रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा महेश ठाकुर, संजय कुर्ले, आनंद लाड(सरचिटणीस ), ज्येष्ठ नेते अनिल तवटे, पहूर चे रमेश धनावडे तसेच आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पूर्व कुडली गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ, मुंबई मंडळ, सुरत मंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पूर्व कुडली ग्रामस्थांनी आमदार रवीशेठ पाटील यांचे मारुती मंदिरासाठी निधी दिल्याबद्दल आभार मानले.

Comments

Popular posts from this blog