शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदावर सुकुमार भोसले यांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश या संघटनेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून श्री सुकुमार भोसले कोल्हापूर यांची नियुक्ती झाली. 

शिवसंग्राम चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग हा कलाकार लोक कलाकार त्या मध्ये शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील कोणत्याही कला प्रकारात काम करणारे कलावंत यात नोंदणी करू शकतात. या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच सरकार दरबारी या असंघटित कलाकारांना संघटित करून त्यांच्या हक्कांचे पालन करण्यात येईल, असे सुकुमार भोसले यांनी सांगितले.

सुकुमार भोसले यांच्या या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री दीपक कदम, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री मार्गेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog