रोहा तालुक्यातील किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

खारगांव/रोहा : सतीश पाटील

रोहा तालुक्यातील किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत नेहमीच रोहेकर आणि रायगडकरांसाठी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान मार्फत युवकांसाठी, बाल गोपाळांसाठी तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

दहीहंडी, नवरात्रौत्सव, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, किल्ले स्पर्धा, कब्बडी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा असे अनेक उपक्रम रबविण्यात येत असतात. तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रांगोळी स्पर्धा व किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि रोहा तालुका स्तरीय किल्ला स्पर्धा मध्ये खारगाव कोळीवाडा जय भवानी  युवा मंडळ यांनी (पद्मदुर्ग किल्ला/कासा किल्ला) अगदी हुबेहूब साकारला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. ही किल्ले स्पर्धा सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान मार्फत भरवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गावदेवी भातसाई  युवा मंडळ, द्वितीय  क्रमांक मोरे आळी रोहा, तृतीय क्रमांक जय भवानी युवा मंडळ खारगांव, तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक रांगोळी प्रेमींनी सहभाग घेतला होता. जय हनुमान गोवे यांनी आपला ऐतिहासिक वारसा जोपसणारे मंडळ जय हनुमान गोवे यांनी लाठी काठी, दांड पट्टा, आगितील उड्या, नारळ फोडी असे अनेक खेळ सादर केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 

खासदार सुनीलजी तटकरे साहेब तसेच लाडके युवा आमदार अनिकेत भाई तटकरे, माजी पालक मंत्री अदिती ताई तटकरे तसेच मधु शेठ पाटील, जयवंत दादा मुंढे, अमित उकडे, प्रीतमताई पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले आणि युवकांना प्रेरणा दिल्या आणि येणाऱ्या पुढील वर्षात अजून मोठ्या प्रमाणात स्पर्धा भारवू असे आश्वासन दिले.

Popular posts from this blog