रोहा येथे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न
ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना पोलीसांची सशस्त्र मानवंदना
रोहा : किरण मोरे
अवघ्या महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस मानवंदनेचा मान मिळणाऱ्या रोह्यातील श्री धावीर महाराज यांचा पालखी सोहळा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शासनाच्या वतीने रोह्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर व त्यांच्या पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी गुरुवारी पहाटे रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, तहसीलदार कविता जाधव यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. शहरातील ठरलेल्या मार्गावरून ग्रामस्थांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतते, यावेळी श्री धावीर महाराजांना पुन्हा पोलिस मानवंदना देण्यात येते.
रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्यास गुरूवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलीसांच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर व पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी खासदार, आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी खा. सुनिल तटकरे, सौ. वरदा तटकरे, माजी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तहसिलदार कविता जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, कार्यवाह भुषण भादेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकार, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, लालताप्रसाद कुशवाह, विश्वस्त नितिन परब, समीर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, सुशिल शिंदे, अमित उकडे, राजेश काफरे, शैलेश रावकर, रविंद्र चाळके आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते, पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलीसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्त झाली. शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदीरात परतते. यावेळी पून्हा महाराजांना पोलीस मनवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सढारांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते. रोह्यात पालखीच्या दर्शनासााठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पपोहाराची व्यवस्था केली जाते.