रोठ खुर्द येथे 'डेल्टा हाईट्स'चा भूमिपुजन कार्यक्रम संपन्न
रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यातील रोठ खुर्द येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'डेल्टा हाईट्स' चा भूमिपुजन कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
नवी मुंबई आणि रोहा येथील नामवंत नामवंत बिल्डर्स म्हणून ओळखले जाणारे श्रीहरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या 'डेल्टा हाईट्स'चे भूमिपुजन संपन्न झाले. 'डेल्टा हाईट्स' ही सुसज्ज अशी बिल्डींग रोहा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एम.आय.डी.सी. परिसराला लागूनच जे. एम. राठी हायस्कूलच्या बाजूलाच उभारली जात असून या बिल्डींग करिता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे. येथून रोहा शहर व रेल्वे स्थानक जवळच असल्याने या बिल्डींगला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. ही संपूर्ण बिल्डींग सर्व सुविधांसह पूर्ण करणारे बिल्डर्स म्हणून ख्याती असलेले 'श्रीहरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' यांनी हे काम सुरू केलेले आहे. यामध्ये 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुरक्षा, गार्डन, क्लब हाऊस, जीम, डीजी सेट 24 तास बॅकअप, मंदीर यांसह अनेक सुविधांनी परिपूर्ण ही बिल्डींग असणार आहे.
भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज चे सहसंपादक तथा उद्योजक श्री. दिनेश मोरे, उपसंपादक श्री. किरण मोरे, तसेच सरपंच समीर महाबळे, 'डेल्टा हाईट्स'ची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बिल्डर्स श्री. बाबूराम वर्मा, त्याचप्रमाणे श्री. अजय वर्मा, श्री. प्रविण मोरे, श्री. आतिष शहा, वैशाली परांजपे, श्री. स्वप्निल परांजपे, श्री. प्रकाश मोरे, श्री. लक्ष्मण मोरे, श्री. महेश मोरे, श्री. सचिन मोरे, श्री. रूपेश मोरे यांच्यासह अनेक प्रतिष्छीत मान्यवरांच्या उपस्थितीत 'डेल्टा हाईट्स'चा भूमिपुजन कार्यक्रम संपन्न झाला.