🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

भाजप युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष पदावर डॅशिंग युवा नेते महेशदादा ठाकूर यांचा निवड

शुभेच्छा देण्यासाठी रोहा तालुक्यातील युवकांची गर्दी

रोहा : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात, ना. आमदार रवींद्रजी चव्हाण कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. आमदार प्रशांत दादा ठाकूर भाजपा जिल्हा अध्यक्ष रायगड, श्री. राहुलजी लोणीकर प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा, माजी मंत्री विद्यमान आमदार रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार भाजपा रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा पदी महेश दादा ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे.

पालेखुर्द गावाचे युवानेते महेश दादा ठाकूर याची भाजपा युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल रोहा तालुक्यातील युवकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे कॉलेज जीवनापासून समाजकारण आणि राजकारणाला सुरूवात महेश दादा ठाकूर यांनी केली वयाच्या 21वर्षी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य संभे ग्रामपंचायत मध्ये 2008 साली निवडून आले त्यानंतर लगातार 3 टर्म आपल्या गावातून पूर्ण पॅनल सतत निवडून आणत आहेत. विविध विकास कामे प्रामुख्याने करता येईल यासाठी सतत प्रयत्न चालू असतात माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, माजी आमदार अवधूत दादा तटकरे, संदीप तटकरे यांची नेहमीच महेश दादा ठाकूर यांना साथ लाभली आहे. ते सामाजिक कार्यांत कायम अग्रेसर असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तरूणवर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

महेश दादा हे नेहमीच आपल्या कामाने चर्चेत आहेत विविध सामाजिक उपक्रमात सातत्याने सहभाग हा नेहमीच सरकारी योजना आपल्या गावातील गोरगरीब लोकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, कोविड काळामध्ये कार्यकर्ता किती तत्पर मदतीला धावून येणारा असावा हे महेशदादानी आपल्या कामातून लोकांना मदत करून दाखवून दिले आहे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, क्रिकेट, कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देणे, पहिल्या कब्बडी रोहा तालुका लीग चे विजेतेपद महेशदादा ठाकूर यांच्या संघाने पटकवले होते. शेतकरी बांधवाना सरकारी योजनेचे लाभ मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत आणी भारतीय जनता पार्टी ने अशा कार्यकर्त्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष पदावर महेश दादा ठाकूर यांची निवड केल्या बद्दल सर्वसामान्य जनतेमधून अभिनंदनाच वर्षाव केला जात आहे.

माजी आमदार अवधूतदादा तटकरे, पेण विधानसभा संयोजक युवा नेते वैकुंठशेठ पाटील, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमितजी घाग, संघटक मिलिंद पाटील, संपर्क प्रमुख राजेशजी मापारा, तालुका मंडळ अध्यक्ष श्री सोपान जांबेकर, जेष्ट नेते विष्णू मोरे, तानाजी देशमुख, बबलूशेठ सय्यद, तसेच तालुक्यातील सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी यांनी महेश दादा ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog