आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग युवासेना आढावा बैठक
चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी
माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत अशी हिंदुत्ववादी शिवसेना तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग युवासेना आढावा बैठक आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पार पडली.
आढावा बैठकीमध्ये सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी कशा प्रकारे काम करायल हवे, कशा प्रकारे युवासेना कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहचायला हवे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी गावा गावात जाऊन पक्ष वाढीसाठी प्रमाणिक प्रयत्न केला पहिजे. आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी या सर्व निवडणुकाना संपूर्ण ताकदीनिशी उतरून लढवुन जिंकण्याच्या दृष्टीने लढवल्या जातिल आणि या पुढे कोणतीही निवडणूक बिनविरोध दिली जाणार नाही अशी भुमिका या वेळी मांडण्यात आली. आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना युवक सचिव विराजमानकर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, युवा नेते अभिराज दळवी, शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे, युवा नेते अजय गायकर, संदेश थळे, संकेत नाईक, मनोज पाटील, नंदन पाटील, संकेत पाटील, आशिष स्वामी, सायली सदावर्ते व युवा सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत युवासेनेची आढावा बैठक पार पडली.
Comments
Post a Comment