🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨

वडखळ पोलीसांनी रेल्वे मधून मोबाईल हिसकावुन नेणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या!

वडखळ : प्रतिनिधी

वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासु रेल्वे स्टेशन येथे १० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ०९.३० वाजण्याच्या सुमारास पनवेल बाजुकडे जाणारी रेल्वे क्रासिंग करिता थांबली असताना संतोष संभाजी चव्हाण रा. गोवंडी-मुंबई हे रेल्वे डब्याच्या दरवाज्यात उभे राहुन फोनवर बोलत असताना त्यांच्या हातातील ओप्पो कंपनीचा १८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन अनोळखी इसमाने अंधाराचा फायदा घेवुन जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेल्याची घटना घडली होती. 

याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. ९८६/२०२२, भा.दं. वि. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपीबाबत कोणतेही धागेदोरे नसताना पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा अतिरिक्त कार्यभार पेण विभाग श्री. किरणकुमार सुर्यवंशी व वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री. तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस  पोलीस उपनिरिक्षक श्री. रोहीदास भोर, पोलीस नाईक अमोल म्हात्रे, सहाय्यक फौजदार नरेश थळकर, पोलीस नाईक दिनेश भोईर, पोलीस हवालदार प्रशांत देसाई, पोलीस नाईक सचिन वावेकर व महिला पोलीस नाईक श्रीमती अपर्णा पाटील यांनी शीघ्र गतीने तपासाची चक्रे फिरवून, तांत्रिक पुराव्यांच्या अधारे प्रथम सदरचा मोबाईल फोन ईरवाडी, ता. पेण येथील एका महिलेकडून जप्त केला. तसेच रेल्वेमध्ये बसलेले फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावून नेणारा चोरटा निलेश परशुराम तांडेल (वय ३५) रा. बुर्डी, पो. कासु ता. पेण याला अटक केली आहे. या धडक कामगिरीबद्दल वडखळ पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog