🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

स्वच्छ भारत अभियान उपक्रमांतर्गत युवा नेते महेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाड विभागात डस्टबीनचे वाटप

रोहा : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवडा १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात स्वच्छ भारत अभियान उपक्रमांतर्गत तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप युवा नेते महेशदादा ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोलाड विभागात स्वच्छता डस्टबीनचे वाटप केले. 

याप्रसंगी भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, रोहा तालुका मंडळ अध्यक्ष सोपान जांभेकर, ज्येष्ठ नेते विष्णू मोरे, तानाजी आप्पा देशमुख, देवरे साहेब यांच्यासह विविध मान्यवरांच्या शुभहस्ते डस्टबीनचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ व युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog