ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

योग्य आहार घेऊन सुदृढ बना - प्रा. कलावती उपाध्याय

पिल्लई एच ओ सी कॉलेजच्या वतीने रा.से.यो. स्थापना दिन साजरा

नागोठणे : महेंद्र माने

खालापूर तालुक्यातील रसायनी येथील पिल्लई एच ओ सी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी पराडे येथील जि.प. प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात योग्य आहार घेऊन सुदृढ बनण्याचा मौलिक सल्ला कॉलेजच्या रा.से.यो. अधिकारी प्रा. कलावती उपाध्याय यांनी दिला. 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दीनाचे औचित्य साधून पिल्लई एच ओ सी कॉलेजच्या रा.से.यो.च्या यूनिटने पराडे-रसायनी येथील जि.प. प्राथमिक शाळेला शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी भेट दिली. यावेळी पोषण अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आहार विषयी मार्गदर्शन करताना प्रा. कलावती उपाध्याय यांनी आपल्या आहारमध्ये पालेभाजी,दूध,फळे तसेच जीवनसत्वयुक्त पदार्थ व सकस, ताजे अन्न खाण्याने होणार्‍या फायद्यांची उदाहरणासहित महत्वपूर्ण माहिती देऊन योग्य आहार घेवून सुदृढ बनण्याचा मौलिक सल्ला शेवटी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला कॉलेजच्या प्राचार्या लता मेनोन, प्रा.अनीता म्हात्रे तसेच कॉलेजच्या रा.से.यो.च्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता फळे देऊन करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog