निजामपूर विभागातील सर्व पाणीपुरवठा योजना व विकासकामे ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली झाली आहेत - खासदार सुनिल तटकरे

विरोधकांनी जनतेची  दिशाभूल करू नये

माणगांव : प्रमोद जाधव

माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजनाचा कार्यक्रम ३ ऑगस्ट रोजी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या मनोगतात निजामपूर विभागातील विविध पाणीपुरवठा योजना व व विविध विकासकामे आणल्याचे संगणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आमदारांचा व पदाधिकारी यांचा खरपूस समाचार घेतला.

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँगेस महाड पोलादपूर माणगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर (बाबूशेठ खानविलकर), निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव, विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष प्रसाद गुरव, निजामपूर विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्षा देविका पाबेकर, सचिव किरण पागार, निजामपूर शहराध्यक्ष महेश शिर्के, निजामपूर सरपंच राजाराम रणपिसे, उपसरपंच गणेश कासार, मिलिंद फोंडके, मारुती कासार (गुरुजी), अनंता महाडिक, घनश्याम तटकरे, सौरभ तटकरे, बिंडा खेडेकर, निलेश खेडेकर, यांच्यासह विविध गावांमधील कार्यक्रमात प्रत्येक गावातील सरपंच व पदाधिकारी, राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला आघाडी व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील जावटे येथील नळपाणी योजनेचे भूमीपूजन, भाले येथील नळपाणी योजनेचे भूमीपूजन,पाणसई येथील सामाजिक सभागृह उद्घाटन व नळपाणी योजना भूमिपूजन, तसेच पाणसई येथे विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी खासदार सुनिल तटकरे व महाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यानंतर कोस्ते खुर्द हनुमान मंदिर सभागृह व नळपाणी पुरवठा योजना भूमीपूजन,कोस्ते बुद्रुक येथील सामाजिक सभागृह व नळपाणी पुरवठा योजना भूमिपूजन,तसेच बोरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील घोडशेतवाडी (कातळाची वाडी) येथील रस्ता व गटार बांधकामाचे भूमिपूजन, व बोरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील देखील विविध कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे व राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या विचारप्रणालीवर प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच अन्य विकासकांमामध्ये निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील वाढीव नळपाणी पुरवठा योजना व तलाव सुशोभिकरणाचे भूमिपूजन, सांगी शिरवली येथील नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, कांदळगाव खुर्द येथील नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, बोडशेत-मानकरवाडी  येथील रस्त्याचे व नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, भागाड ग्रामपंचायत हद्दीतील तासगाव येथील नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, विळे-वरचीवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, विळे येथिल स्मशानभूमीचे भूमिपूजन, विळे गावठाण ग्रामपंचायत हद्दीतील बेडगाव येथील नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आदी योजनांच्या उदघाटनांचा व भुमिपूजनाच्या कार्यक्रमाचा यामध्ये समावेश होता.

निजामपूर विभागासाठी मंजूर झालेल्या विविध शासकीय लोकोपयोगी योजना, विविध विकास कार्यक्रम, राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या विकासकामांची भूमिपूजने यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडली. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी निजामपूर विभागातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

Popular posts from this blog