🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

नागोठणे सहकारी भात गिरणी या संस्थेची विशेष सभा घेणार - सभापती प्रभाकर ठाकुर

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील नागोठणे सहकारी भात गिरणी या संस्थेच्या कार्यालयात शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी 11.00 वा. संस्थेचे सभापती प्रभाकर ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली  53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर त्याच ठिकाणी 11.30 वा. घेण्यात आलेल्या सभेत संस्थेच्या सभासदांची एक विशेष सभा लवकरच घेणार असल्याचे प्रभाकर ठाकुर यांनी सांगितले.

सभेच्या सुरूवातीला मागील सभेचे इतिवृत्तांत, ताळेबंदी, नफा-तोटा पत्रक वाचून सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यानंतर आयत्या वेळच्या विषयात पांडुरंग जवके व सुधाकर जवके यांनी सभेचा अजेंठा सर्वांना पोहचला नसल्याचे तसेच वर्तमान पत्रात जाहिर सूचना देऊन सर्वांना माहिती मिळत नसल्याचे सभापतींच्या निदर्शनात आणून दिले.त्यांनी केलेल्या सूचनेची सभेत चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्व संस्थेच्या सभासदांना प्रत्येक्ष अजेंठा देऊन लवकरच संस्थेची एक विशेष सभा घेण्यात येणार असल्याचे सभापती प्रभाकर ठाकुर यांनी संगितले. या सभेला भाई टके,शिवराम शिंदे,मधुकर ठमके,वसंत जाधव,दगडू दळवी,अनंत वाघ,चंद्रकांत गायकवाड,चंद्रकांत जांबेकर,एकनाथ जांबेकर,हिराजी शिंदे,चंद्रकांत भोईर,पांडुरंग जवके,सुधाकर जवके,रामचंद्र देवरे यांच्यासह संस्थेचे अनंत पाटेकर व रामचंद्र देवरे उपस्थित होते. उपस्थित सभासदांचे प्रभाकर ठाकुर यांनी आभार मानून राष्ट्र गीतांनी सभेची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog