माणगांवमध्ये खेळ मांडला जुगाराचा, जुगार क्लबमध्ये जुगार शौकीनांची गर्दी! मटका किंग बोलतात "पोलीस आमच्या खिशात" 

माणगांवमध्ये अवैध जुगार क्लबमुळे पोलीसांचे धिंडवडे निघण्याच्या मार्गावर

गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल

रायगड : प्रतिनिधी

माणगांवमध्ये बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून इथे पोलीस जिवंत आहेत का मेलेत? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. मटका किंग बोलतात की, पोलीस आमच्या खिशात असून त्यांना आम्ही "...टा" वर मरतो म्हणून आमच्यावर कारवाई करायची त्यांची हिंमत होत नाही!" बेकायदा मटका चालविणारे मटका किंग अशा प्रकारचे वक्तव्य करीत असल्यामुळे येथे पोलीसांचेच धिंडवडे निघण्याच्या मार्गावर आलेले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माणगावचे पोलीस म्हणतात की, "जुगार क्लब बंद आहे!" पण क्लब सुरूच आहे!

माणगांवच्या पोलीसांना जुगार क्लब दिसत नाही! नेत्रतज्ञांमार्फत पोलीसांची डोळे तपासणी करण्याची गरज?

माणगांव शहरात मुंबई-गोवा महामार्गावर वक्रतुंड हॉटेलच्या वर अवैध जुगार क्लब राजरोसपणे सुरु असून यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या बेकायदा जुगार क्लबकडे स्थानिक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. येथील पोलीस म्हणतात की, जुगार क्लब बंद आहेत, कुठेही सुरू नाही! परंतु उपलब्ध झालेले फोटो पाहता माणगावच्या पोलीसांना त्यांच्याच परिसराविषयी माहिती नाही असे दिसतेय. परिणामी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी माणगाव पोलीसांची नेत्रतज्ञामार्फत डोळे तपासणी करून घेणे गरजेचे बनून राहिलेले आहे. कारण इथे तर जुगार क्लब सुरू असल्याचे पुरावे जाहिर होऊ लागले आहेत.

विशेष म्हणजे हा अवैध जुगार क्लब लॉजींगच्या जागेत सुरू असल्यामुळे लायसन्स लॉजींगचे, की जुगाराचे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे तातडीने हा अवैध जुगार क्लब बंद करण्यात यावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

येथे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना येथे चिकन, मटण, मच्छी, गुटखा, सिगारेट फ्री मध्ये मिळत असल्याने येथे जुगाऱ्यांची चांगलीच चंगळ होत असल्याची चर्चा माणगांव तालुक्यात रंगली आहे. सदरच्या क्लबमध्ये माणगांव तालुक्यातील अनेक शौकीन जुगार खेळण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशा जुगार क्लबमुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त होत असून शासनाची कोणतीही परवानगी या क्लबला नसून बेकायदेशीरपणे व राजरोसपणे हा जुगार क्लब सुरु असून या जुगार क्लब विरूद्ध तातडीने कारवाई करून तो कायमचा बंद करावा अशी मागणी माणगांव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog