कोलाड पोलीस स्टेशन अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी

माणुसकी प्रतिष्ठान रोहा शाखा, निष्ठा महिला स्वयंसहायता समूह वरसे, लायन्स क्लब कोलाड  व सायली नितीन सदावर्ते मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कोलाड  पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी व परिवार यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र, दंत, तपासणी व औषध उपचार शिबिर राबवण्यात आला. या शिबिरासाठी अलिबाग येथून डॉ राजाराम हुलवान संस्थापक माणुसकी प्रतिष्ठान, डॉ आशिष पारधी नेत्र चिकित्सक लायन्स क्लब अलिबाग, डॉ प्रवीण डालमिया दंतरोगतज्ञ रोहा, डॉ प्रकाश मिस्त्री नागोठणे जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅब हे शिबिराला उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे उद्घाटन कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुभाष जाधव यांनी दिप प्रज्वलित करून केले. शिबिराला पोलीस स्टेशन मधून यशस्वीरित्या पाठिंबा मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा शाखेतून महेंद्र भातीकरे, विष्णू नरे, सोहम मयेकर तसेच निष्ठा महिला स्वयंसाहायता समूह यांच्या सचिव विभा भातीकरे सायली नितीन सदावर्ते मित्र मंडळ यांच्याकडून सायली नितीन सदावर्ते, आशिष स्वामी आणि माणुसकी प्रतिष्ठान नागोठणे शाखा अध्यक्ष श्री मंगेश पत्की तसेच कोलाड पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला.

Popular posts from this blog