🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे संकुलस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा व विविध विषयांवरील प्रदर्शन संपन्न

अलिबाग (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे (दि.08 व 09 सप्टेंबर 2022) रोजी आयोजित करण्यात आलेल्या संकुल स्तरीय टेबल टेनिस स्पर्धांचे तसेच विविध विषयांवरील प्रदर्शन कार्यक्रमांचे उद्घाटन (दि.08 सप्टेंबर 2022) रोजी संपन्न झाले. 

या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यालय व्यवस्थापन समिती तसेच विद्यालय सल्लागार समितीचे सदस्य आणि पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम सुतार तसेच जवाहर नवोदय विदयालयाचे पालक शिक्षक संघाचे सदस्य नितीन बडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध विषयांच्या प्रदर्शनाच्या परीक्षकांच्या भूमिकेत डॉ.संजय खोब्रागडे, श्रीमती रुपाली खडतर, डॉ.विनोद कदम, श्री.एम.एन.बरुळे, श्री.राजेश धबाले हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय टेबल टेनिस स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र टेबल असोसिएशन, मुंबई चे प्रतिनिधी पराग अकोलेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी नवोदय विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुणे आणि मान्यवर परीक्षकांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्राचार्य  के.वाय.इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. यावेळी प्रमुख पाहुणे आणि मान्यवर परीक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संपन्न झालेल्या विविध विषयांच्या प्रदर्शनात पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले :- विज्ञान प्रदर्शन- प्रथम- सर्वेश देशमुख (ज.न.वि. रायगड), द्वितीय- पियुष पवार (ज.न.वि. अहमदनगर), द्वितीय- ऋषीकेश भुजबळ (ज.न.वि. पुणे), तृतीय- सुशांत होळकर (ज.न.वि. लातूर). गणित प्रदर्शन- प्रथम- साहिल कोकरे (ज.न.वि. रायगड), द्वितीय- नंदिनी महाजन (ज.न.वि. लातूर), तृतीय- सानिका ससाणे (ज.न.वि. बीड). माहिती तंत्रज्ञान प्रदर्शन–प्रथम- सृष्टी चिंचकर (ज.न.वि. रायगड), द्वितीय- मानसी मुरकूटे (ज.न.वि. उस्मानाबाद), तृतीय- मयूर राठोड (ज.न.वि. बीड), समाजशास्त्र प्रदर्शन- प्रथम- काशाब शेख (ज.न.वि. रायगड), द्वितीय- चैतन्य पालवे (ज.न.वि. रायगड), तृतीय- बालाजी घारगिल (ज.न.वि. पुणे), समाजोपयोगी उत्पादक कार्य प्रदर्शन- प्रथम- कृष्णा ढवळे (ज.न.वि. पुणे), द्वितीय- राम शिंदे (ज.न.वि. बीड), तृतीय- सुयश राऊत (ज.न.वि. सोलापूर)

याशिवाय टेबल टेनिस क्रीडा प्रकारातील तीन गटात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे याप्रमाणे :- वयोगट 14 वर्षे मुली- प्रथम- समृध्दी कलकुटे (ज.न.वि. बीड), द्वितीय- श्रृती काळे (ज.न.वि. रायगड), तृतीय- रितीका फापळ (ज.न.वि. बीड). वयोगट 14 वर्षे मुले- प्रथम- अथर्व घुले (ज.न.वि. उस्मानाबाद), द्वितीय- रामकृष्ण पांडे (ज.न.वि. बीड), तृतीय- मनोमय गायकवाड (ज.न.वि. रायगड). वयोगट 17 वर्षे मुली- प्रथम- आरती बनसोडे (ज.न.वि. बीड), द्वितीय- प्रांजली पाटोळे (ज.न.वि. रायगड), तृतीय- संजना चौगुले (ज.न.वि. उस्मानाबाद). वयोगट 17 वर्षे मुले- प्रथम- आदर्श मसुटे (ज.न.वि. सोलापूर), द्वितीय- पियुष कोरडे (ज.न.वि. रायगड), तृतीय- ऋषी कांदे (ज.न.वि. बीड). वयोगट 19 वर्षे मुली- प्रथम- साक्षी पाटील (ज.न.वि. रायगड), द्वितीय- विदिशा गोटे (ज.न.वि. रायगड), तृतीय- सहेली दिवेकर (ज.न.वि. रायगड). वयोगट 19 वर्षे मुले- प्रथम- अथर्व जठारी (ज.न.वि. रायगड), द्वितीय- सचिन म्हात्रे (ज.न.वि. रायगड), तृतीय- प्रतिक शिंदे (ज.न.वि. रायगड).

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार केंद्रेकर यांनी केले तर आभार विद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य शिरीष जाधव यांनी मानले. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक सेमिनारचे देखील सादरीकरण केले. हे सेमिनार आणि प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे, उपप्राचार्य शिरीष जाधव तसेच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, खेळ विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog