रिलायन्स येथे एक दिवसीय जल जीवरक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण संपन्न
शिहू : मंजुळा म्हात्रे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड नागोठणे व जल जीवरक्षक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जल जीवरक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षणाचे आयोजन येथील रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड जलतरण तलाव नागोठणे येथे दि.९ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
या वेळी ६० प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग दर्शवला. जल जीवरक्षक सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे यांनी प्रशिक्षनर्थिना जल जीवरक्षणा विषयी मार्गदर्शन केले तर आपत्ती निवारण कक्षाचे सागर दहिंबेकर यांनी प्रात्यक्षिके करून दाखविले.
यावेळी नॅशनल स्कुबा ड्राइव वाईल्डर वेस्ट ऍडवेंचर हरीश सानप, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, गीतेश कुथे, रोशन कुथे, रवींद्र नाईक, रिलायन्स इंडस्ट्रिज चे अध्यक्ष शशांक गोयल, हेड एच आर गौतम मुखर्जी, हेड आय आर विनय किर्लोस्कर, इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील, सचिव उदय दिवेकर, सी.एस अनिमेश दईया, डॉ. बिपीन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
येथील बहुतेक गावे ही आंबा नदी पात्रालगत असल्यामुळे वारंवार पुरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीला सामोरे कसे जावे या साठी आम्ही विभागातील तरुणांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले.
- इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील
रेस्क्यू च्या माध्यमातून एखाद्याला बुडताना कसे वाचवायचे, त्यानंतर कसे प्रथमोपचार करायचे, हे आम्ही येथील तरुणांना प्रशिक्षण देत आहोत जेणेकरून मोठ्यात मोठे अनर्थ टाळले जातील.
- अंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे