🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

भाजपाच्या वतीने बावनकुळे यांना दिल्या शुभेच्छा; महामार्गावरील खड्ड्यांचेही दिले निवेदन

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील भाजपाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा देऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांबाबत एक निवेदन दिल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी दिली.  

अधिक माहिती देताना सचिन मोदी यांनी सांगितले की,येथील हॉटेल कामथ गोविंदामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही दिवसात होत असलेल्या केंद्रीय मंत्री यांच्या दौराबाबत येण्यात आलेल्या बैठकीमध्ये नागोठणे भाजपाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महामार्गावरील खड्ड्यांबाबत दिलेल्या निवेदनात महामार्गावर पाडलेल्या खड्ड्यांमुळे नेहमी अपघात होत असून अनेक प्रवाशी जखमी होत आहेत. त्याच प्रमाणे थोड्याच दिवसात गणेशोत्सव येत असून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना आपला प्रवास सुखकर होण्यासाठी लवकरात लवकर खड्डे भरण्याबाबत निवेदन दिले. याबाबत केंद्रीयमंत्री ना.नितिन गडकरी यांच्या बरोबर चर्चा करून संबधित खात्याला आदेश देण्याची विनंती करणार असल्याचे बावनकुळी यांनी सांगितल्याची माहिती सचिन मोदी यांनी दिली. यावेळी भाजपा जिल्हा संयोजक सोपान जांभेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस सतीश धारप, पेण विधानसभा समन्वयक वैकुंठ पाटील, तालुका सरचिटणीस आनंद लाड, पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, ललित पाटील यांच्यासह विभागातील भाजपा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog