शिहू येथे गोपाळकाला मोठया उत्सहात संपन्न
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्शभूमीवर राज्यातीलच नव्हे तर सर्व देशातील सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोठी अडचण होती. मात्र या वर्षी सर्वच निर्बंध शिथिल झाल्यानंतर यावर्षी गोपाळकाला शुक्रवार दि.१९ ऑगस्ट रोजी उत्सहात संपन्न झाला.
बहिरेश्वर गोविंदा पथक शिहू येथील तरुणांनी बहिरेश्वर महाराजांना पाच थरांची मानाची सलामी देऊन गोपाळकालाला सुरवात झाली. गावातील तरुणांनी हातात हात घालून गल्लीबोळातून गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा असे नाम घोष करून गोपाळकालाचा आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले तर ठिकठिकाणी लावलेल्या दहीहंडी साठी मानवी मनोरे रचताना दिसत होते. यात लहान-मोठ्यांसह अनेकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला.