🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

शेतपळस येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळून तीन वर्षीय बालक गंभीर

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील पळस ग्रामपंचायत हद्दीत शेतपळस येथील रोहिदास घासे यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी झाला आहे. 

याबाबत आदिक वृत्त असे की, एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अशी दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान शेतपळस येथील रोहिदास घासे यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले असून त्यात रिद्धी घासे (९ ) व रियांश घासे (३ ) जखमी झाले असून तीन वर्षीय रियांश घासे हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी एम. जी. एम पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची खबर मिळताच प्रशासकीय अधिकारी, तलाठी, तहसीलदार कविता जाधव यांनी भेट देऊन त्यांना शासनाकडून सर्वोतपरी मदत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog