नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई 

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांची उल्लेखनीय कामगिरी

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी 

येथील शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देऊन त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जेएसडब्ल्यू कंपनीची जलवाहिनी फुटून चोळे खार व गांधे खार येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनंत भुरे यांची भेट घेऊन त्यांना शेतात जल वाहिनी फुटल्याची कल्पना दिली. याची दखल घेत सतत पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली. आपल्याला मिळालेल्या नुकसानीचा धनादेश पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून भुरे यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog