🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रोठखूर्द येथे सार्वजनिक शौचालयाच्या दुर्गंधीचे साम्राज्य, रोगराई पसरण्याची शक्यता 

दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका! 

रोहा : किरण मोरे 

रोहा तालुक्यातील रोहा-कोलाड मार्गावरील रोठ खूर्द गावातील मुख्य रस्त्यावर सार्वजनिक शौचालयाच्या भयानक दुर्गंधीमुळे या परिसरात रोगराई पसरण्याची चिन्हे दिसू लागली असून या दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

येथील सार्वजनिक शौचालयाला टाकी नसल्यामुळे शौचालयातील घाण उघड्यावर बाहेर पडू लागल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. येथे बाजूलाच व्यायामशाळा आणि प्राथमिक शाळा असून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. 

येथील नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे अशीच परिस्थिती असल्यामुळे कोरोना महामारी नंतर येथील नागरिकांना महादुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असताना देखील येथील ग्रामपंचायतीने अस्वच्छतेकडे दुर्लक्ष का केले आहे? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Comments

Popular posts from this blog