🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

बंध रेशमाचे, एक राखी कर्तव्याची; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस बांधवांना रक्षाबंधन

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.  

कोणतेही सण, उत्सव साजरे न करता अहोरात्र महिला भगिनींसह जनतेचे रक्षण करणारे पोलीस बांधवांना एक राखी कर्तव्याची म्हणून शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोठणे येथील पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या मंगल कार्यक्रमाला पी.एस.आय. नारायण चव्हाण, पी.एस.आय.सचिन निकम, ए.एस.आय. दयानंद ठाकूर, पोलीस हवालदार विनोद पाटील, पोलीस नाईक नितिन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान पिंगळे तसेच युवासेना युवती जिल्हाधिकारी धनवंती दाभाडे, युवती उपतालुकाधिकारी शालिनी शिगवण, शिहू विभाग संपर्क संघटिक हेमांगी बंगाल, शिहू विभाग संघटिका वर्षा कोळी, नागोठणे शहर संघटिका प्रणिता पत्की, नागोठणे उपविभाग संघटिका प्रतिभा शिर्के, कुहिरे माजी सरपंच मनिषा जवके यांच्यासह पोलीस कर्मचारी व शिवसेना महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog