संगणक परिचालिका सौ. प्राजक्ता कडू यांना CSC-SPV कंपनीने कामावरून केले कमी 

रायगड जिल्हा संगणक परिचालिका संघटनेने केला जाहीर निषेध, उपोषणाचा इशारा 

रोहा : समीर बामुगडे

तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतच्या संगणक परिचालिका सौ. प्राजक्ता कडू गोफण येथील रहिवाशी आसुन त्या सन 2011 पासुन संगणक परिचालिका म्हणुन काम पाहत असून त्या गेले दोन वर्षां पासुन ग्रामपंचायत शेडसईच्या निवडणुकीतुन सदस्या म्हणून निवडून आल्यानंतर त्या उपसरपंच म्हणुन ही निवडून आल्या व उपसरपंच पदाचाही काम करत आसून त्या दोन्हीही पदांचे जबाबदारीने काम करीत आहेत असे त्यांचे म्हणणे आहेे. त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देताच CSC-SPV कंपनी करुन कामावरून कमी करण्यात आला. सौ. प्राजक्ता कडू यांनी सदरील बाब पूर्णपणे चुकीची आसुन सदरच्या कंपनी करुन परिपत्रकाला केराची टोपली दाखविण्यात आली आसा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या गोष्टी चा रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटने च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आणि रायगड जिल्ह्यातील संघटीत आसलेल्या सर्व संगणक परिचालकांनी सर्व प्रकारच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे.

सौ. प्राजक्ता कडु यांना तात्काळ कामावर घ्यावे अन्यथा बुधवार 10 ऑगस्ट 2022 रोजी पंचायत समिती रोहा कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदन गट विकास अधिकारी रोहा, तहसीलदार रोहा, तालुका व्यवस्थापक अपले सरकार सेवा केंद्र पंचायत समिती रोहा व पोलीस निरीक्षक रोहा यांना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना रायगड ने दिले असून त्या वेळेस जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला CSC-SPV कंपनी जबाबदार राहील आसा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Popular posts from this blog