🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

नवजीवन विद्यामंदिर तळाशेत हायस्कुल मध्ये माथेफिरूचा धिंगाणा, १५ लाखाचे केले नुकसान

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

माणगांव तालुक्यातील इंदापुर येथील नवजीवन विद्यामंदिर हायस्कूल तसेच कै.ग.द.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय तळाशेत येथे मंगळवार दि.२ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरून व्यक्तीने या हायस्कूल व महाविद्यालयाच्या इमारती परिसरामध्ये घुसून सात रूमचे सात लॉक तोडून आतमध्ये घुसून त्याने एकूण १५ लाख रूपयाचे काही मिनिटांत नुकसान केले आहे. 

सविस्तर वृत्त असे की नवजीवन विद्यामंदिर तसेच कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्याल तळाशेत हे इंदापुर शहरापासून काही अतंराच्या हाकेवर असून हे हायस्कुल व महाविद्याल मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता बंद झाल्यानंतर एक अज्ञात माथेफिरून हा या हायस्कुल व महाविद्यालच्या इमारती परिसरा मध्ये घुसून एक दमात त्याने सात रूमचे लॉक तोडून त्यानी १० लाख रूपये किमतीचे साहित्य असलेल्या विज्ञान शाळेची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नासधूळ केली आहे. याच विज्ञान शाळेचे गेल्या महिनाभरात आ.आदितीताई तटकरे याच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तसेच हा माथेफिरू एवढयावरच न थांबता त्याने संस्थेच्याआँफिस मध्ये घुसून कागदपत्र फर्निचर देखील तोडफोड केली,शिक्षक स्टाफरूम खुर्च्या, टेबल, फर्निचर, कागदपत्रांची नासधूळ केली आहे. शाळा, संस्था, विद्यार्थी यांच्या संबंधित कागदपत्रांचू देखील नासधूस, वर्गखोल्यांमधील सरस्वती देवीच्या मुर्तीची तोडफोड केली आहे, हा सर्व प्रकार या परिसरातील काही नागरिकांनी बघितल्याने त्यांनी या हायस्कुलच्या शिक्षक वर्गाला त्वरित सांगितल्याने नवजीवन विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्याद्यापक, तसेच शिक्षक वर्ग, हायस्कुल मधील कर्मचारी, तसेच इंदापुर विभाग शिक्षण प्रसारक मंडळचे उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत, सचिव अविनाश मांडवरक, दिपकशेठ जाधव, उदय अधिकारी, समिर मेहता, बाळा खातू, मनोज जैन, नितिन घोणे, तसेच इंदापुरकर नागरिक याठिकाणी उपस्थित झाले. ही बातमी माणगांव पोलीस ठाणे यांना समजताच त्यांनी इंदापुर नवजीवन विद्यामंदिर येथे येऊन त्यांनी या जागेची पाहणी करून या अज्ञात माथेफिरू व्यक्तीला अटक करून माणगांव पोलीस ठाणे येथे घेवून गेले असून पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog