जल जीवन मिशन अंतर्गत आमडोशी पाणी पुरवठा योजनेला 1.18 कोटीची प्रशासकिय मान्यता
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेसाठी कोकणचे भाग्यविधाते खा.सुनिल तटकरे, मा. पालकमंत्री अदिती तटकरे तसेच आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 18 लाख 62 हजार 150 रुपयेची प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. त्याचे मान्यता पत्र नडवली येथील एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील व विनोद पाशीलकर यांच्या उपस्थितीत खा. सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते आमडोशी ग्रामस्थांकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी मा. जि.प.सदस्य चंद्रकांत जांबेकर, मा.उपसरपंच एकनाथ जांबेकर, वांगणी ग्राम पंचायत सदस्य प्रमोद जांबेकर व शरद कामथे यांच्यासह राजू जांबेकर, प्रमोद भोसले, अमित जांबेकर तसेच आमडोशी ग्रामस्थ उपस्थित होते.