🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

धर्मफेरीचे मुख्य आकर्षण ठरली भारत मातेच्या भूमिकेतील निष्ठा म्हात्रे

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील हिंदू जनजागृती मंचच्या वतीने रविवार 07 ऑगस्ट रोजी भगव्या वातावरणात संपन्न झालेल्या धर्मफेरीचे मुख्य आकर्षण भारत मातेच्या भूमिकेतील निष्ठा म्हात्रे ही बाल कलाकार ठरली आहे.

रविवार 07 ऑगस्ट रोजी नागोठणे नगरीत भगव्या टोप्या परिधान केलेल्या हिंदू बांधव-भगिनीसह शेकडो तरुण-तरुणींच्या जयघोषाने परिसर दुमदुमत निघालेली धर्मफेरी संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. या फेरीच्या अग्रस्थानी धर्मध्वज हातात घेतलेली भारत मातेच्या भूमिकेतील कु.निष्ठा किशोर म्हात्रे ही इयत्ता सातवी मधील बाल कलाकार सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली आहे. निष्ठा हिने सतत तीन ते चार तास धर्मफेरीमध्ये धर्मध्वज हातात घेऊन शहरात न थकता प्रसन्न चेहर्‍याने सहभाग घेतल्याबद्दल तिचे विभागातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog