भाग्योदय सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

होणार मोफत आरोग्य तपासणी शिबीर

नागोठणे : महेंद्र माने 

रोहा तालुक्यातील आमडोशी येथील भाग्योदय मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव 31 ऑगस्ट ते शुक्रवार 09 सप्टेंबर पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीरासह विविध कार्यक्रमाने संपन्न होणार आहे.    

यामध्ये बुधवार 31 ऑगस्ट दुपारी 01.00 वाजता' वंदे मातरम् ' प्रतिष्ठान रोहा यांच्या ढोल ताशाच्या गजरात श्रींची प्रतिष्ठापना, गुरुवार 01 व शुक्रवार 02 सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम,शनिवार 03 सप्टेंबर रोजी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने मुंबई – नेरुळ येथील तेरणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत होणार्‍या   हेल्थ चेकअप शिबीराचे उद्घाटन आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते,सोमवार 05 सप्टेंबर सायंकाळी 7.30 वा. नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर यांच्या सौजन्याने श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ रोहा यांचे सुश्राव्य संगीत भजन,रात्री 10.30 वा. माजी आमदार धैर्यशिल पाटील, सियट टायर्सचे व्हाईस प्रेसिडेंट,एचआर हेड विकास शिर्के, भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर तसेच रसाळ सरपंच नरेश खाडे यांच्या उपस्थितीत विविध गुणदर्शन कार्यक्रम,मंगळवार 06 सप्टेंबर सकाळी 10.00 वा. चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,रात्री 10.30 वा. आ. अनिकेत तटकरे व मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच जयवंत मुंडे,उदय जवके,संतोष कोळी,सचिन कळसकर,अतुल काळे,विनायक गोळे,सुमित काटे यांच्या सौजन्याने ऑर्केस्ट्रा जल्लोष महाराष्ट्राचा,बुधवार 7.30 वा. रोहा ता.कुणबी समाज अध्यक्ष शीवराम शिंदे व पळस माजी सरपंच हिराजी शिंदे यांच्या उपस्थितीत ह.भ.प. मारुतीमहाराज कोल्हटकर यांचे किर्तन,गुरुवार 08 सप्टेंबर सकाळी श्री सत्यनारायण महापूजा,सायं. 04.00 वाजता रोहा रा.काँ. महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू, सायं. 06.00 वा. वांगणी उपसरपंच शुभांगी जांबेकर, प्रतिक्षा भोसले,शुभ्रा कामथे, किरण जाध,सुजाता राऊत व रोशनी जांबेकर यांच्या सौजन्याने मीरा पाटील,पनवेल यांचे अवघा रंग एक झाला हे व्याख्यान,रात्री 10.00 वा. राजश्री जांबेकर,ज्योती जांबेकर,संपदा शेडगे,श्वेता जांबेकर,स्नेहल जांबेकर यांच्या सौजन्याने निनाद शिंदे निवेदक खेळ पैठणीचा, रात्री 11.00 वा. आमडोशी ग्रामस्थ मंडळ यांचे  जागरण, शुक्रवार 09 सप्टेंबर रोजी सायं.04.00 वाजता श्रीचे मिरवणूक व विसर्जन होणार असल्याची माहिती मंडळाचे सदस्य प्रमोद जांबेकर यांनी दिली.विभागातील नागरिकांनी सदरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती मंडळाचे भूषण जांबेकर व सचिव तुषार पातेरे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog