🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

सुल्झर पंप्स् इंडियाची भव्य वेतन वाढ ; कामगार खुशीत

गुलाल उधळून केला आनंद साजरा

नागोठणे : महेंद्र माने

नवी मुंबई-दिघा येथील सुल्झर पंप्स् इंडिया प्रा.लि. या कंपनीमध्ये ९ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईस युनियन (सेऊ) चे अध्यक्ष रुपेश पवार व जनरल सेक्रेटरी संजय आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली सेऊच्या युनियन कमिटीने कंपनी बरोबर यशस्वी वाटाघाटी करून भव्य वेतन वाढीचा करार संपन्न करून सेऊच्या युनियन कमिटीने कामगारांना गणपतीच्या आगमना पुर्वीच मोठी आनंदाची भेट दिली आहे. या वेतन वाढीने तेथील कामगार खुशीत असून त्यांनी वाजत गाजत,नृत्य करीत गुलाल उधळून आपला आनंद साजरा केला.

सुल्झर पंप्स् इंडिया हि उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले API पंप बनवते. API पंपांच्या निर्मितीमध्ये अनेक कंपन्यांनी प्रवेश केला असून यामध्ये स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत पगारवाढीचा करार करणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच होते. परंतु सेऊच्या नवीन  युनियन कमिटीने केलेल्या वेतन वाढीच्या करारामध्ये त्रैवार्षिक कराराची रक्कम सरासरी रुपये 28,000 /- असून या त्रैवार्षिक भव्यदिव्य करारमध्ये वेतनवाढीच्या तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कामगारांचे कमाल वार्षिक वेतन रु.22,86,747 /- तसेच दुसरे कमाल वार्षिक वेतन रु.22,35,694 /- होणार आहे. सदरील करार संपन्न होताच कामगारांनी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार व त्यांच्या कमिटी सभासदांना खांद्यावर घेऊन सभा स्थाना पर्यंत मिरवणूक काढून या कराराचा आनंद साजरा केला. सदरील कराराच्या वेळी कंपनी व्यवस्थापन मॅनेजिंग डायरेक्टर सुजल शहा, एच.आर.आणि ॲडमिनिस्ट्रेशन वाईस प्रेसिडेंट गुरूलालसिंग उप्पल, आर. ई. एस. व पी. एस. प्रमुख उन्नधा राजा,  फायनान्स व कॉन्ट्रॉलिंग वाईस प्रेसिडेंट लक्ष्मीनारायण तोषनीवाल, उत्पादन विभाग जनरल मॅनेजर जितेंद्र सावंत, प्रोक्यूरमेन्ट विभागा वाईस प्रेसिडेंट शिरीष शाह, क्वालिटी व सेफ्टी विभाग प्रमुख आनंद क्षीरसागर, एच.आर.आय.आर. विभाग असिस्टंट जनरल मॅनेजर अमित सिरोही, लीगल व सी. एस. विभाग डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती अलका सिंघ  तसेच सेऊचे अध्यक्ष रुपेश पवार, जनरल सेक्रेटरी संजय आंब्रे, उपाध्यक्ष मयुर उपाध्ये, खजिनदार माधव सकपाळ, सचिव किसन भोर, उपसचिव रणजित म्हात्रे यांच्यासह केतन कांगणे, संजय भारती व संतोष मांजरेकर हे कमिटी मेंबर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog