शिवसेना महिला उपजिल्हा संघटक दर्शना जवके तर शहर संघटक प्रणिता पत्की यांची नियुक्ती

सर्व पदाधिकार्‍यांनी घ्रेतली सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांची भेट ; महिला मार्गदर्शन मेळावा घेणार

नागोठणे : महेंद्र माने

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून उपजिल्हा संघटक पदी दर्शना जवके तर नागोठणे शहर संघटक पदी प्रणिता पत्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त झालेल्या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी शिवसेना पेण अलिबाग विधानसभा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी सर्व महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन मेळावा घेणार असल्याचे दर्शना जवके यांनी सांगितले. 

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांमध्ये दर्शना जवके उपजिल्हा संघटक (पेण - सुधागड मतदार संघ), मेघना चव्हाण - शहर संघटक (पेण शहर), वर्षा कोळी विभाग संघटक (पेण तालुका - शिहू विभाग), संगीता खोडागळे - तालुका संघटक (सुधागड - पाली तालुका), वर्षा सुरावकर - तालुका संपर्क संघटक (सुधागड तालुका), रचना हजारे - शहर संघटक (सुधागड - पाली शहर), अश्विनी रुईकर – उपजिल्हा संपर्क संघटिका (पेण - सुधागड विधानसभा), स्नेहल देवळेकर - तालुका संघटक (अलिबाग तालुका), राखी खरीवले शहर संघटक (अलिबाग शहर), तनुजा पेरेकर संपर्क संघटक (अलिबाग शहर), राजश्री मिसाळ - तालुका संघटक (मुरूड तालुका), सुहासिनी सुभेदार- शहर संघटक (मुरूड शहर), प्रणिता पत्की - शहर संघटक (नागोठणे शहर), दीप्ती दुर्गावले - विभाग संघटक (नागोठणे), प्रतिभा म्हात्रे - उपविभाग संघटक (नागोठणे) यांची नियुक्ती करण्यात आली असून या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी शिवसेना पेण अलिबाग विधानसभा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांची त्यांच्या घरी भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याची माहिती दर्शना जवके यांनी देऊन सर्व महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांसाठी लवकरच मार्गदर्शन मेळावा घेण्यात येणार असल्याचे दर्शना जवके यांनी सांगितले. 

Popular posts from this blog