कोलाड येथे काशिनाथ वाघमारे व उदय घोसाळकर यांचा सेवापूर्ती समारंभ दिमाखात संपन्न

कोलाड : सदानंद तांडेल

शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होणे हा शासनाचा नियमच आहे. याच नियमाप्रमाणे काशिनाथजी वाघमारे व उदय जी घोसाळकर हे निवृत्त होत आहेत. द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे हे दोघे सेवेत होते. आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्यात त्यांना चांगल्या मनोकामना व शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काशिनाथ जी वाघमारे हे आपल्या अखंड सेवेमध्ये अतिशय संयमी व शांत स्वभाव असणारे व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखले जायचे. बडबड नको कृती हवी असे संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब लिमये यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांच्या या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन वाघमारे सर यांनी केले. आपले विद्यार्थी, आपली शाळा व आपले काम या विषयातच ते रममान असायचे. हळगी वाजवणे हा त्यांचा आवडता छंद याच हळगीच्या जीवावर त्यांनी स्वतःचे नाव रोहा तालुक्यात प्रसिद्ध केले. दुसरे सत्कारमूर्ती उदयजी घोसाळकर हे क्लेरिकल कामात व शासकीय कामात अतिशय हुशार व्यक्तिमत्व. विद्यालयाच्या प्राचार्यानंतर विद्यालयाचा प्राण म्हणजे उदय घोसाळकर हेच होते. शासनाने कोणतीही माहिती मागविल्यास त्याची पूर्तता करणे कागदपत्र फाईल करणे तसेच प्रत्येक गोष्ट अपडेट ठेवणे याला ते नेहमीच महत्त्व द्यायचे. या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी व उर्वरित आयुष्य सुखाने, समाधानाने व आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहावे अशी कामना करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय हजर होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व कळंबोली विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जी पालवे उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव रविकांत घोसाळकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंदजी जोशी उदय घोसाळकर यांचे मोठे बंधू दादा घोसाळकर दिपक घोसाळकर के. आ. बांठिया विद्यालयाचे प्राचार्य माळी सर तसेच सुतारवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीराम काळे व सर्व दोन्ही सत्कारमूर्तींचे कुटुंबीय हितचिंतक आणि विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरूणकर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी या दोघांनाही भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog